
*दिनांक : 01/05/2006**बल्लारपूर तहसील कार्यालयात कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण*
*वने व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झेंडावंदन, तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडून मानवंदना

बल्लारपूर :* 1 मे 2006, जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व पार पडला.
*महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा बल्लारपूरचे आमदार मा. सुधीर मुनगंटीवार* यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी *तहसीलदार सौ. रेणुका कोकाटे* यांनी मा . मुनगंटीवार यांना सलामी दिली. *नायब तहसीलदार* देखील कार्यक्रमास उपस्थित होते.

या प्रसंगी *नगराध्यक्ष सौ. अलका वाढई* व *उपनगराध्यक्ष श्री. देवेंद्र आर्या* यांनी विशेष उपस्थिती लावली. भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर *पोलीस दलाच्या तुकडीने* शिस्तबद्ध पद्धतीने सलामी देऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “देशाच्या जडणघडणीत कामगार वर्गाचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध आहे. कामगारांच्या घामातूनच महाराष्ट्र घडला आहे.”
तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी सर्व कामगार बांधवांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. ..96o4343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


