Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorized*भांदक रेल्वे परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला*  ओळख पटविण्यासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन*

*भांदक रेल्वे परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला*  ओळख पटविण्यासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन*

बल्लारशाह :* भांदक रेल्वे स्थानकाजवळ कि.मी. 852/8-12-A या परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना 27 एप्रिल 2026 रोजी उघडकीस आली आहे.

या प्रकरणी रेल्वे पोलीस चौकी, बल्लारशाह येथे *मर्ग क्र. 10/2026, कलम 194 BNSS* अन्वये नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑन ड्युटी असलेले कर्मचारी श्री. सुरजकुमार गुप्ता यांनी सदर घटनेबाबत लेखी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर पुरुष मृत अवस्थेत आढळून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे *35 ते 40 वर्षे* दरम्यान असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर *29 एप्रिल 2026 रोजी भद्रावती स्मशानभूमीत* शासकीय नियमानुसार दफनविधी करण्यात आला आहे.

*मृत व्यक्तीचे वर्णन :*

– *वय* : अंदाजे 35 ते 40 वर्षे

– *कपडे* : अंगावर निळ्या रंगाचा टी-शर्ट, DXL साईज

– *चेहरा* : मिशी व दाढी वाढलेली

– *शरीरयष्टी* : सामान्य

या अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी व त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

*वरील वर्णनाशी मिळती-जुळती व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा सदर व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ

रेल्वे पोलीस चौकी, बल्लारशाह येथे संपर्क साधावा.*

SP India news Channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. no…9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular