Thursday, June 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedविसापूर चौकाजवळ बीकुंड परिसरात भीषण आग, फायर ब्रिगेडच्या तत्परतेने अनर्थ टळला

विसापूर चौकाजवळ बीकुंड परिसरात भीषण आग, फायर ब्रिगेडच्या तत्परतेने अनर्थ टळला

मुख्य संपादक– योगिता पाटेकर mo. no. 9604343287 – SP India news

इसापूर, दि. 6 एप्रिल 2026: कल देर रात विसापूर चौक स्थित बीकुंड के पास अचानक रूद्र रूप लेती हुई आग लगने की घटना समोर आली. रात्रीच्या अंधारात आगेच्या ज्वाळा वाढत होत्या आणि जंगल परिसर असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. आजूबाजूला जंगली जानवरांचा धोका असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

इसापूर टोल नाके के पास टोल सुपरवाइजर दिलीप कंचन लवर यांची नजर आगीवर पडताच त्यांनी तातडीने फायर स्टेशनला माहिती दिली. फायर स्टेशनवर तात्काळ रितेश पीटकर फायरमैन, शाहरुख खान फायरमैन आणि वाहन चालक ऋतिक बोबडे हे कर्मचारी उपस्थित होते. माहिती मिळताच तिन्ही कर्मचाऱ्यांनी फायर गाडी घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

रस्ता कठीण आणि अंधार असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास मोठी मेहनत आणि मशक्कत करावी लागली. तरीही जिद्दीने आणि प्रसंगावधान राखून रात्री 10:30 बजे से लेकर 1:30 बजे तक तीनों कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने आग विझवण्याचे काम केले. पाण्याचा मारा करून रूद्र रूप धारण केलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.

रात्रीचा अंधार आणि अवघड रस्ता यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले, तरीही तिन्ही कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी टळली. घटनेनंतर परिसरातील लोकांनी फायर ब्रिगेडच्या जवानांचे मनापासून आभार मानले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular