Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वातंत्र्य दिनापासून एमआयडीसी पोलिसांची 'अमली पदार्थ मुक्त नाशिक' जनजागृती मोहीम सुरू

स्वातंत्र्य दिनापासून एमआयडीसी पोलिसांची ‘अमली पदार्थ मुक्त नाशिक’ जनजागृती मोहीम सुरू

 

मुख्य संपादक योगिता पाटेकर – SP India news – mo.no. 9604343287

जिल्हा नाशिक – प्रतिनिधी दादासाहेब उबाळे 

नाशिक: नाशिक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून ‘अमली पदार्थ मुक्त नाशिक’ या संकल्पनेवर आधारित विशेष जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे आणि समाजात अमली पदार्थांबाबत जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलीस पथकाने शहरातील भोर टाऊनशिप या ठिकाणी असलेल्या मातोश्री लक्ष्मीबाई बाळू भोर प्राथमिक विद्या मंदिर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त मार्गदर्शन सत्र आयोजित केले. यामध्ये अमली पदार्थांचे दुष्परिणाम, कायदा आणि त्याचे परिणाम तसेच व्यसनापासून दूर राहण्याचे उपाय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांना “नशेला नाही, देशाला होय” असा संदेश देत व्यसनमुक्त जीवनशैलीचा संकल्प करण्यास सांगण्यात आले.

त्याचबरोबर एमआयडीसी पोलीसांनी परिसरातील *रुग्णालयांना भेटी* देऊन रुग्ण व नातेवाईकांमध्ये जनजागृती केली. अमली पदार्थांमुळे होणारे शारीरिक व मानसिक आजार, व्यसनमुक्ती केंद्रांची माहिती आणि उपचारासाठी उपलब्ध सरकारी योजनांबाबत पत्रके वाटप करण्यात आली. डॉक्टरांशी समन्वय साधून व्यसनग्रस्तांना वेळीच मदत मिळवून देण्यावर भर देण्यात आला.

तसेच अंबड सातपूर लिंक रोडवर असलेल्या परमवीर चक्र शहीद अब्दुल
हमीद फाउंडेशन या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला तसेच MIDC पोलीस स्टेशनचे PSI मुक्तेश्वर लाड यांनी अमली पदार्थ विरोधी सर्व नागरिकांना शपथ दिली तसेच नारा देण्यात आला.

या मोहिमेबाबत बोलताना एमआयडीसी पोलिसांनी सांगितले की, “स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा आपला समाज व्यसनमुक्त असेल.

मुख्य संपादक योगिता पाटेकर. SP India news channel. Mo.no.9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

जिल्हा नाशिक – प्रतिनिधी दादासाहेब उबाळे 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular