
मुख्य संपादक — योगिता पाटेकर. मो. 9604343287 , SP India news
भद्रावती, शहरात मोकाट कुत्र्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. दिनांक 25 मे रोजी गौतम नगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी 4 निष्पाप चिमुकल्यांवर हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले. चाव्याच्या गंभीर जखमांमुळे वेदनेने विव्हळणाऱ्या मुलांना घेऊन पालक ग्रामीण रुग्णालयात धावले. मात्र तिथे गेल्यावर धक्काच बसला.
“इथे रेबीजची लसच नाही, चंद्रपूरला घेऊन जा”असा सल्ला डॉक्टरांनी दिला. गंभीर अवस्थेतील लेकराला घेऊन गरीब पालकांनी करायचे काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. कुत्रे पकडणारी यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. ग्रामीण रुग्णालयात रेबीजसारखी अत्यावश्यक लस उपलब्ध नसणे हा गंभीर निष्काळजीपणा आहे. एखाद्या लेकराचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता नागरिक करत आहेत.
या घटनेनंतर शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक नरेंद्र पढाल, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, नगरसेवक महेश जीवतोडे व उषा जाधव यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांची भेट घेऊन निवेदन दिले
मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. ग्रामीण रुग्णालयात रेबीज व तत्सम औषधी तात्काळ उपलब्ध करावी.
नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवावा.
भद्रावतीकर आता संतापले असून प्रशासनाच्या ठोस कारवाईची प्रतीक्षा करत आहेत.
भद्रावतीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस. 4 मुलांना चावा, पण ग्रामीण रुग्णालयात रेबीज लसच नाही. चंद्रपूरला रेफर करण्याचा सल्ला. संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना निवेदन._
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


