Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिनांक: 18/05/2026 "कल्याण " पश्चिमेत आरोग्य सेवेचा सन्मान : भारतीय पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या...

दिनांक: 18/05/2026 “कल्याण ” पश्चिमेत आरोग्य सेवेचा सन्मान : भारतीय पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनी वैद्य विंद्र पवार ‘हेल्थ आयकॉन’ पुरस्काराने गौरविले

 

SP India news संपादक योगिता पाटेकर -9604343287 … चायनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे

वर्धा–अर्पित वाहाने–8956647004

“कल्याण ” पश्चिम, ता. भिवंडी, जि. ठाणे: रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या भारतीय पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा वर्धापन दिन सोहळा रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी कल्याण पश्चिम येथील ब्राह्मण सोसायटी सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. आरोग्य क्षेत्रात जीव ओतून काम करणाऱ्या कर्तृत्वाचा यावेळी जाहीर सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले वैद्य विंद्र पवार यांचा गौरव. आपल्या निस्वार्थ सेवेतून शेकडो रुग्णांना जीवदान देणाऱ्या वैद्य पवार यांना मानाचा ‘हेल्थ आयकॉन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच इमर्जन्सी मेडिकल सर्विसमध्ये उत्कृष्ट शिक्षण व प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांना विशेष प्रमाणपत्रही बहाल करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात हा सन्मान स्वीकारताना संपूर्ण सभागृह अभिमानाने उभे राहिले.

भारतीय पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे प्रेसिडेंट डॉ. बी. एस. वाघ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. वाघ म्हणाले, “पॅरामेडिकल कर्मचारी हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. वैद्य विंद्र पवार यांच्यासारखे समर्पित व्यक्तिमत्त्व हीच आमच्या संस्थेची खरी ओळख आहे. आपत्कालीन सेवेसाठी सक्षम मनुष्यबळ घडवणे हे आमचे ध्येय आहे.”

या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत मान्यवर आणि पॅरामेडिकलचे शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त आरोग्य जनजागृती, प्रात्यक्षिके व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.

“रुग्णसेवाच ईश्वरसेवा” हा मंत्र घेऊन भारतीय पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट भिवंडी-ठाणे परिसरात आरोग्य सेवेचे नवे आदर्श निर्माण करत आहे, याची प्रचिती या सोहळ्यातून आली.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular