
SP India news संपादक योगिता पाटेकर..9604343287
वर्धा–अर्पित वाहाने..8956647004
वर्धा: “कायदा सर्वांसाठी समान आहे” हे वाक्य फक्त भिंतीवर लिहिण्यापुरते उरले आहे का? असा संतप्त सवाल आता वर्धेकर विचारत आहेत. कारण आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनाक्रमाची इत्यंभूत माहिती देऊनही वर्धा पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा पत्ताच नाही.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना या प्रकरणात आठ ते दहा लेखी तक्रारी सादर करण्यात आल्या. इतकेच नाही तर तीन ते चार वेळा प्रत्यक्ष भेटून आरोपी पोलीस अधिकाऱ्यांचे कारनामे पुराव्यानिशी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र महिने उलटून गेले तरी संबंधित आरोपी खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांवर साधी चौकशीचा साधा कागदही हललेला नाही.
ही बाब केवळ प्रशासकीय निष्क्रियता नाही, तर भारतीय संविधानाच्या कलम 14 ने दिलेल्या “कायद्यापुढे समानता” या मूलभूत अधिकाराची उघड पायमल्ली आहे. पुरावे हातात असूनही खाकीच्या दबावापुढे कायदा हतबल होतो का, हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाला पडला आहे.

“एखाद्या सामान्य नागरिकाने गुन्हा केला तर त्याच्यावर तत्काळ एफआयआर दाखल होतो, त्याला रातोरात उचलले जाते. मग हाच कायदा शासकीय पदावर बसलेल्या आरोपी पोलिसांसाठी वेगळा का? पुरावे असूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही?” असा थेट आणि जळजळीत सवाल पीडित नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनले आणि त्यांच्यावर कारवाई करायला प्रशासनाची हिंमत होत नसेल, तर सामान्य माणसाने दाद मागायची कोणाकडे? ही निष्क्रियता न्यायप्रक्रियेवरील जनतेचा विश्वासच उद्ध्वस्त करणारी आहे.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लोकशाहीतील ‘समान न्याय’ या तत्त्वालाच तिलांजली दिल्यासारखे होईल, अशी तीव्र भावना वर्धेकरांमध्ये आहे.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा
या चैनल करिता प्रतिनिधीची निवड करण्यात येत आहे 9604343287 या नंबर वर संपर्क साधावा


