
मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. no. 9604343287 SP India news
चंद्रपूर:
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ अवैधरित्या बाळगून विक्री करणाऱ्यांवर रामनगर पोलीस स्टेशनने मोठी कारवाई केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर काकडके व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सौ. प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात शोध पथकाने छापा घालून ही कारवाई केली.

दिनांक. ०८/०९/२०२६ रोजी रात्री २१.२५ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने रहमतनगर, चंद्रपूर येथील तौफीक करीम भिमानी, वय ३६ वर्षे, रा. नुरी मज्जिद जवळ* यांच्या राहत्या घरावर पंचासमक्ष छापा टाकला.
छाप्यात आरोपीच्या ताब्यातून होल्टा, ईगल, क्रेझ या कंपनीचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखू व सुगंधीत तंबाखूचे साहित्य मिळून आले. एकूण रु. ६७,७५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन येथे *अपराध क्र. ९०४/२०२६* भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास *स.पो.नि. सचिन राठोड* करीत आहेत.
पोलिसांचे आवाहन:
नागरिकांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री/साठवणूक करु नये. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
पोलीस निरीक्षक
रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा
SP India news channel


