
मुख्य संपादक– योगिता पाटेकर SP India news mo.no. 9604343287
चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असलेली कोळसा खाण आणि ताडोबाची हिरवीगार समृद्धी यामागे या मातीतून घडलेल्या कर्तृत्ववान नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून घडलेले आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर असले व्यक्तिमत्व म्हणजे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार.
30 जुलै 1962 रोजी जन्मलेल्या सुधीर भाऊंनी विद्यार्थी दशेपासूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यात पाऊल टाकले.
1995 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग 4 वेळा लोकांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले. विधानसभेतील त्यांचे भाषण म्हणजे अभ्यास, अभ्यास आणि लोकप्रश्नांचा दणदणाट म्हणून ओळखले जाते. विरोधी पक्षात असतानाही त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
सलग विधानसभेत जनतेचा विश्वास जिंकणे हीच त्यांची खरी कमाई आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून त्यांनी राज्याला दिलेले योगदान मोलाचे आहे.
चंद्रपूरच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
जनसंपर्क कार्यालय
आमदार सुधीर मुनगंटीवार
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


