Tuesday, July 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedम्हाडामध्ये सदनिका देण्याच्या नावाखाली ९२.७७, लाखांची फसवणूक रामनगर पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग,...

म्हाडामध्ये सदनिका देण्याच्या नावाखाली ९२.७७, लाखांची फसवणूक रामनगर पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग, आरोपी जेरबंद

मुख्य संपादक- योगिता पाटेकर मो. न. 9604343287 SP India new

चंद्रपूर:
गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळ अर्थात म्हाडा मध्ये सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९२,७७,७४०/- रुपये ची फसवणूक करणाऱ्या आरोपीस रामनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

गुन्ह्याची हकीकत:
चंद्रपूर शहरातील शुभम सुधाकर वांगलवार यांच्यासह २६ नागरिकांना म्हाडामध्ये फ्लॅट मिळवून देतो असे सांगून आरोपी *भूपेंद्र चंद्रिकापुरे उर्फ भिमराव फुलचंद चंद्रिकापुरे, वय ४२ वर्षे, रा. वर्धा रोड, नागपूर* याने वेळोवेळी एकूण ९२,७७,७४० रुपये स्वीकारले. मात्र सदनिका न देता त्यांची फसवणूक केली.

या प्रकरणी दि. २९/०३/२०२६ रोजी रामनगर पोलीस स्टेशन येथे भा.ना.सु.सं. कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) नुसार गुन्हा क्र. ४२८/२०२६ दाखल करण्यात आला होता.

फिल्मी स्टाईल अटक:
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत नागपूर, मुंबई, वाशी, नवी मुंबई, नाशिक अशा ठिकाणी राहण्याचे ठिकाण बदलत होता. मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम यांच्या नेतृत्वात सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले यांच्या पथकाने नागपूर येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

सध्या आरोपीकडून फसवणुकीची रक्कम हस्तगत करण्याचे व त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

नागरिकांना आवाहन:
जर कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.

या यशस्वी कारवाईसाठी:
मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर काकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चोगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रभावती एकुरके, स.पो.नि. हनुमान उगले, पोलीस अंमलदार रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगरे, राजू चिताडे, सुनिल गायके यांनी विशेष परिश्रम घेतले.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no.9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular