Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedबल्लारपूर तालुक्यात मद्यधुंद पिकअप चालकाचा कहर - 1 मृत्यू, 4 जखमी

बल्लारपूर तालुक्यात मद्यधुंद पिकअप चालकाचा कहर – 1 मृत्यू, 4 जखमी

मुख्य संपादक – योगिता पाटेकर- मो.न. 9604343287- SP India news-  ballarpur district Chandrapur 

काल रात्री सुमारे 9:30 वाजता शेणगाव, ता. जीवती ते बल्लारपूर या मार्गावर मद्यधुंद अवस्थेतील पिकअप क्रमांक MH 32 KQ 2595 च्या चालकाने एकापाठोपाठ अनेकांना धडका देत थरार निर्माण केला.

पहिली  धडक गुरुनानक कॉलेजजवळ स्कूटी क्र. MH 34 CJ 7786 ला धडक दिली. यात स्कूटीस्वार अर्शद खान वय 48 वर्षे, रा. बल्लारपूर/बामणी – मेडिकल व्यावसायिक हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पळत असताना बामणी येथे आदित्य मृतुमोरी, रमेश मुंडेवाली 35 वर्षे, प्रवीण ढेंगर 31 वर्षे यांच्या दुचाकीला धडक. तिघे गंभीर जखमी.
पुढे: प्रमोद निब्रड 27 वर्षे, रा. बामणी यांनाही धडक. ते जखमी.
शेवट: दहेली गावाजवळ पिकअपने ट्रक क्र. OD 16 KE 1211 ला जोरदार धडक दिली. यात पिकअप चालक बालाजी कोंडे जखमी झाला. ट्रकची डिझेल टाकी फुटून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले.घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून रस्त्यावरील डिझेल साफ केले. त्यामुळे संभाव्य आग व मोठी दुर्घटना टळली.

सर्व जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मृतक अर्शद खान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर येथे ठेवण्यात आला आहे.

या थरारक सिरियल अपघातामुळे बल्लारपूर परिसरात खळबळ उडाली आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत

“दारू पिऊन वाहन चालवणे गुन्हा आहे. आपला व इतरांचा जीव धोक्यात घालू नका.”

मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 SP India news channel  जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular