
एस पी इंडिया न्यूज संपादक योगिता पाटेकर..9604343287
वर्धा–अर्पित वाहाने ..8956647004
परभणी/वर्धा: बुद्ध विहाराच्या पायरीवर आणि चिमुकल्यांच्या शाळेच्या दारातच दारूचे घोट रिचवले जात असतील तर संस्कृती आणि शिक्षण वाचवणार कोण? असा संतप्त सवाल करत वंचित बहुजन युवा आघाडीने पोखर्णीतील अवैध दारूविक्रीविरोधात दंड थोपटले आहेत.
परभणी तालुक्यातील मौजे पोखर्णी नृ. येथे बौद्ध समाज मंदिर व केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच खुलेआम देशी दारूचा अड्डा थाटल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीने १८ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना धडक तक्रार निवेदन दिले.
“मंदिरात येणारे भाविक आणि शाळेत जाणाऱ्या मुलींची रोज याच दारू अड्ड्यासमोरून वर्दळ असते. नशेत धुंद असलेल्यांकडून छेडछाड, विनयभंग होण्याची भीती रोज सतावते. दैठणा पोलीस ठाण्याला वारंवार सांगूनही पोलीस हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत,” असा घणाघाती आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून माफियांवर कठोर कारवाई करा, अन्यथा ६ जून २०२६ रोजी परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्राणांतिक उपोषणाचा बडगा उगारला जाईल, असा थेट इशाराच संघटनेने दिला आहे.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष गणेश वाल्मीक गाढे, तालुकाध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, महानगराध्यक्ष मुदस्सीर असरार, महानगर संघटक रंजीत मकरंद, युवा जिल्हा सचिव मोहन गाढे, कोषाध्यक्ष प्रताप पंडित, माजी जिल्हा महासचिव मुजफ्फर खान, समता सैनिक दलाचे विजयकुमार सावंत, सुशीलाबाई निसर्गन तसेच ग्रामस्थ रामेश्वर भदर्गे, रोहिणी भदर्गे, पृथ्वीराज असले यांच्यासह वंचितचे पदाधिकारी व संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“दारू माफिया आणि पोलीस यांच्या अभद्र युतीमुळेच पोखर्णीत लेकी-बाळींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने आता डोळे उघडावेत, नाहीतर वंचितचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no..9604343287 जाहिराती न्यूज करिता संपर्क साधावा
- या चैनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे . वरील नंबर वर संपर्क साधावा


