
SP India News Channel
संपादक: योगिता पाटेकर mo.no. 9604343287
भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून बल्लारपूर शहरात संविधानिक मूल्यांचा जागर करण्यात येणार आहे. यानिमित्त नागरिकांसाठी संविधान उद्देशिका वाटपाचा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.
बस स्टॅण्ड परिसरातील आर्य कलेक्शन येथे बुधवार, 21 मे 2026 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल.
नगर परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र आर्य व सामाजिक क्षेत्रात कार्यरत मोना धानोरकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्व. राजीव गांधी यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील योगदान व भारतीय संविधानाची मूलतत्त्वे जनमानसापर्यंत पोहोचवणे हा या मागचा हेतू आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना भारतीय संविधानाची उद्देशिका मोफत वितरित केली जाईल. बल्लारपूरकरांनी या अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
संपादक: योगिता पाटेकर
मोबाईल: 9604343287
जाहिरातीसाठी संपर्क साधावा. या चॅनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे, वरील संपर्क साधावा.


