मुख्य संपादक –योगिता पाटेकर ,मो. 9604343287, SP India news

चुनाळा, ता. राजुराआज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर ग्रामीणच्या वतीने आयोजित *”पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६” अंतर्गत दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रशिक्षण वर्गास महाराष्ट्राचे माजी मंत्री, विकासपुरुष मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच प्रख्यात विचारवंत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज भैया अहिर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनातून संघटन बळकटीकरण, विचारधारा आणि कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी अत्यंत मोलाचे विचार ऐकण्याची संधी मिळाली.
या प्रसंगी मलाही उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षण शिबिरामधे महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते विविध ११ संघटनात्मक व तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रसंगी मंचावर आमदार श्री. देवरावजी भोंगळे, वरोरा विधानसभेचे आमदार श्री. करणजी देवतळे, माजी आमदार प्रा. श्री. अतुलजी देशकर, श्री. राजेंद्र गांधी सर, सौ. संध्याताई गुरनुले, कुमारी अल्काताई आत्राम,सौ. वंदनाताई शेंडे ,डॉ. मंगेश गुलवाडे व श्री.रवींद्र शिंदे यांची उपस्थिती लाभली.
जिल्ह्यातील सुमारे २२५ पेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा प्रशिक्षण वर्ग अधिक प्रेरणादायी व यशस्वी ठरला.
सशक्त संघटन • सक्षम कार्यकर्ता • विकसित राष्ट्र
*हरीश ज. शर्मा*
*भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर (ग्रा)*
*माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर*
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


