
मुख्य संपादक — योगिता पाटेकर mo. no. 9604343287 – SP India news
नागपूर, सिताबुल्डी, दि. 6 जून 2026: स्थानिक सूर मिलन ग्रुपतर्फे उत्कर्ष हॉल, सिताबुल्डी येथे प्रसिद्ध बॉलीवूड गायिका आशा भोसले यांच्या स्मरणार्थ एक अद्वितीय संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रम रसिकांसमोर सादर करण्यात आला. दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाला गेस्ट सिंगर म्हणून सौ. आशा चौधरी व सौ. स्नेहा मुलेवार मॅडम या विशेष आमंत्रित गायक म्हणून उपस्थित होत्या. तसेच संत कबीर प्रोडक्शनचे कलाकार श्री सुरेंद्र मेश्राम यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली. संत कबीर फिल्म प्रोडक्शन चे फिल्म/नाटक कलावंत देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.

संगीताच्या सुरांची ही यात्रा “जब छाये मेरा जादू” या गीताने आरंभ झाली आणि “जिना क्या अजी प्यार बीना” या गाण्याने रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात संपन्न झाली. या प्रसंगी सौ. आशा चौधरी, सौ. हर्षा चौधरी, सौ. स्नेहा मुलेवार, सौ. वर्षा देशमुख, सौ. अनघा पांढरीपांडे, सौ. वाणीश्री पांडे, कु. वैशाली प्रयागी, श्री. कमलेश टहिल्यानी, श्री. मकरंद पांढरीपांडे, श्री. निखिल वझलवार, श्री. प्रशांत लोखंडे, श्री. विजय कुमार, मकरंद बक्षी व सौ. संगीता बक्षी यांनी आशा भोसले व आर डी बर्मन यांची एक से एक डिस्को, गझल अशी गीते सादर करून रसिकांची मने जिंकली आणि भरभरून वाह वा मिळविली.
या भव्य संगीतमय सोहळ्याचे आयोजन श्री मकरंद बक्षी यांनी केले होते तर व्हिडिओ व साऊंडची जबाबदारी शाविंद्र बिसेन यांनी उत्तम प्रकारे सांभाळली. कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्र संचलन व आभार प्रदर्शन सूर मिलनच्या संयोजिका सौ संगीता बक्षी यांनी आपल्या वाणीने उपस्थितांची मने जिंकली.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


