Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedतिरंगा बाईक रॅलीत आ. किशोर जोरगेवार स्वतः बाईक चालवत सहभागी.देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले...

तिरंगा बाईक रॅलीत आ. किशोर जोरगेवार स्वतः बाईक चालवत सहभागी.देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले चंद्रपूर; भाजप महानगरच्या तिरंगा बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 मुख्य संपादक योगिता पाटेकर — mo.no. 9604343287 – SP India news 

चंद्रपूर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा बाईक रॅली शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या रॅलीत आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः बाईक चालवत सहभाग नोंदविला. त्यांच्या या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता रॅलीला सुरुवात झाली. आमदार जोरगेवार यांनी स्वतः बाईक चालवत रॅलीचे नेतृत्व केले. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने दुचाकींवर तिरंगा ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले की, तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, त्यागाचे आणि एकतेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असून, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली आहे. प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देत राष्ट्र प्रथम या भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, आजच्या तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा आणि राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करणारा आहे, असेही त्यांनी सांगितले.
रॅलीदरम्यान सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका, जनता कॉलेज, वाहतूक कार्यालय, एसटी वर्कशॉप चौक, रामनगर पोलीस स्टेशन चौक, बंगाली कॅम्प चौक मार्गे रॅली गिरणार चौक येथे पोहोचली. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित या तिरंगा बाईक रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा चंद्रपूरकरांच्या राष्ट्रभक्तीची प्रचिती देणारा ठरल

मुख्य संपादक योगिता पाटेकर  SP India news channel — mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 


 

Previous article
Next article
नाशिकच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा* *नाशिक* : 80 वा स्वातंत्र्य दिन नाशिकच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये देशभक्तीच्या भावनेने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी 7 वाजता स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी PSI मुक्तेश्वर लाड, API सपोनी भंडे, PSI मुख्तार मणियार यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड जवान आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परेडची कमान PSI मुक्तेश्वर लाड यांनी सांभाळली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला सलाम केला आणि कर्तव्य बजावताना देशसेवेची भावना कायम ठेवण्याचे आवाहन केले. “जनतेची सेवा हेच आमचे खरे कर्तव्य आहे” असे त्यांनी सांगितले. संपूर्ण स्टेशन परिसर तिरंग्याच्या झेंड्यांनी आणि रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. एमआयडीसी परिसरातील नागरिकांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावून पोलिसांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular