
मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 SP India news channel
जिल्हा नाशिक- प्रतिनिधी दादासाहेब उबाळे

नाशिक : 80 वा स्वातंत्र्य दिन नाशिकच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये देशभक्तीच्या भावनेने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आज सकाळी 7 वाजता स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी PSI मुक्तेश्वर लाड, API सपोनी भंडे, PSI मुख्तार मणियार यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड जवान आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परेडची कमान PSI मुक्तेश्वर लाड यांनी सांभाळली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

याप्रसंगी बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला सलाम केला आणि कर्तव्य बजावताना देशसेवेची भावना कायम ठेवण्याचे आवाहन केले. “जनतेची सेवा हेच आमचे खरे कर्तव्य आहे” असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण स्टेशन परिसर तिरंग्याच्या झेंड्यांनी आणि रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

एमआयडीसी परिसरातील नागरिकांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावून पोलिसांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

मुख्य संपादक योगिता पाटेकर – SP India news channel mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा
नाशिक जिल्ह्या — प्रतिनिधी दादासाहेब उबाळे


