संपादक — योगिता पाटेकर, SP India news Mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा
बल्लारपूर / बल्लारशा येथे ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरा, शाळेत विशेष कार्यक्रम तर शहरात भव्य जुलूस
बल्लारपूर / बल्लारशा — ता. बल्लारपूर येथील वैभव कॉन्व्हेंट स्कूल मध्ये जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी चा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात आला, तर बल्लारशा शहरात याच पवित्र पर्वानिमित्त भव्य जुलूस-ए-मोहम्मदी मोठ्या जोमाने काढण्यात आला.

वैभव कॉन्व्हेंट स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर नात सादर करून सर्वांची मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हज्जन ताहेरा बी, आलिमा अर्शी अन्सारी, आलिमा अफसाना शेख, सोफिया फातिमा उपस्थित होत्या. शाळेच्या संस्थापिका रजिया खान व फरजाना शेख उपस्थित होत्या. पाहुण्यांनी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवन, त्याग, प्रेम, शांती व बंधुत्वाच्या संदेशावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना यावेळी इस्लामिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षिका अंजुमसबा शेख यांनी केले.
शहरातील जुलूस आणि पोलीस बंदोबस्त –
त्याचबरोबर बल्लारशा शहरात ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघालेल्या भव्य जुलूसमध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला. शहराला आकर्षक रोषणाई व झेंड्यांनी सजविण्यात आले होते. ठिकठिकाणी जुलूसचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.
हा संपूर्ण जुलूस शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी बल्लारशा पोलीस स्टेशनच्यावतीने चोख व चाक-चौबंद बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कार्यक्रम पूर्णपणे शांततामय व सलोख्याच्या वातावरणात पार पडला.
शेवटी देशात अमन, शांती आणि आपसी भाईचारा नांदावा यासाठी विशेष दुआ करण्यात आली.
मुख्य संपादक — योगिता पाटेकर SP India news channel mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधाव


