Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedनगर परिषद बल्लारपूर द्वारा 'नगर अध्यक्ष चषक 2026' क्रिकेट स्पर्धा संपन्न*  डॉक्टर्स संघाने...

नगर परिषद बल्लारपूर द्वारा ‘नगर अध्यक्ष चषक 2026’ क्रिकेट स्पर्धा संपन्न*  डॉक्टर्स संघाने पटकावले विजेतेपद, विशाल  तांडा ने जिता मॅन ऑफ द मॅच’*

 

*बल्लारपूर :* नगर परिषद, बल्लारपूर यांच्या वतीने *’नगर अध्यक्ष चषक 2026’* क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. अलका वाढाई* होत्या. स्पर्धेचे *उद्घाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विशाल वाघ* यांच्या हस्ते करण्यात आले. *प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष श्री. देवेंद्र आर्या* उपस्थित होते.

स्पर्धेत *नगर परिषद कर्मचारी संघ* आणि *डॉक्टर्स संघ* यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळला गेला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात *डॉक्टर्स संघाने विजय मिळविला.*

*डॉक्टर्स संघाचे खेळाडू विशाल त यांनी अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना *’मॅन ऑफ द मॅच’* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नगराध्यक्षा सौ. अलका वाढाई व उपनगराध्यक्ष श्री. देवेंद्र आर्या यांच्या हस्ते विजेत्या संघास चषक प्रदान करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular