Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorized*दिनांक : 09/05/2026*वरवट येथे मोहा फुलाच्या गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त* *1,15,630/- रुपयांचा...

*दिनांक : 09/05/2026*वरवट येथे मोहा फुलाच्या गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त* *1,15,630/- रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपी धनराज खोब्रागडे विरुद्ध गुन्हा दाखल*

 

चंद्रपूर :* पोलीस स्टेशन दुर्गापूर परिसरातील मौजा वरवट येथे झुडपी जंगलातील नाल्यालगत हातभट्टी लावून मोहा फुलाची गावठी दारू काढली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.सदर खबरेवरून पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता *धनराज धर्मदेव खोब्रागडे, रा. वरवट* हा इसम मोहा फुलाची गावठी दारू काढताना रंगेहाथ मिळून आला.

*गुन्ह्याचा तपशील :*
– *पोलीस ठाणे :* दुर्गापूर
– *अप. क्रं. :* 260/2026
– *कलम :* 65(ब), (क), (इ), (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा
– *घटनेची ता. व वेळ :* दि. 09/05/2026 रोजी सकाळी 10:30 ते 11:30 वा. दरम्यान
– *गुन्हा दाखल ता. व वेळ :* दि. 09/05/2026 रोजी दुपारी 14:50 वा.
– *घटनास्थळ :* मौजा वरवट शेत शिवारातील जंगली नाल्यालगत, ता. जि. चंद्रपूर

*जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :*
मोह फुलाच्या सडव्याने भरलेले 13 प्लॅस्टिकचे ड्रम, प्रत्येकी 50 किलो प्रमाणे एकूण 650 किलो सडवा, प्रति किलो 150/- रुपये प्रमाणे एकूण किंमत 97,500/- रुपये. 3 प्लास्टिक कॅन मध्ये एकूण 49 लिटर मोहफूल गावठी दारू, प्रति लिटर 200/- रुपये प्रमाणे एकूण किंमत 9,800/- रुपये. मोहफूल गावठी दारू काढण्यासाठी वापरलेले 5 मोठे लोखंडी ड्रम, प्रति ड्रम 1000/- रुपये प्रमाणे एकूण 5,000/- रुपये. दारू काढण्यासाठी वापरलेले 13 प्लास्टिक ड्रम, प्रति ड्रम 200/- रुपये प्रमाणे एकूण 2,600/- रुपये. 3 प्लास्टिक कॅन, प्रत्येकी 50/- रुपये प्रमाणे 150/- रुपये. दारू काढण्यासाठी 2 लाकडी चाटू, किंमत अंदाजे 200/- रुपये. दारू काढण्यासाठी वापरलेले 3 टिनाचे पिपे, प्रति नग 60/- रुपये प्रमाणे एकूण 180/- रुपये. दारू काढण्यासाठी वापरलेला 2 प्लास्टिक पाईप, किंमत 200/- रुपये. *असा एकूण 1,15,630/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.*

सदरची यशस्वी कारवाई *मा. पोलीस अधीक्षक श्री. कायंदेपाटील साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली *पोस्टे प्रभारी अधिकारी* यांच्या नेतृत्वात *पो.उपनि. पंकज वासाडे, पो.उपनि. बिंकालवार, म.पो.हवा. राणी ब. नं. 1095, पो.अ. संदीप ब.नं. 202, पो.अ. मंगेश शेंडे ब.नं. 1074, पो.अ. रुपेश सावे ब.नं. 868* यांनी केली.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular