चंद्रपूर, दि. १३/०३/२०२६
पर्यावरण रक्षणासाठी “सेव्ह लोहारडोंगरी सेव्ह ताडोबा” ही जनचळवळ पर्यावरण कार्यकर्ते बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जंगल व पर्यावरण संरक्षणाच्या प्रश्नावर ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सर्वोदय कल्याणकारी बहुद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने सर्व वकील बांधवांना समर्थन पत्र देऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वनुमाते समर्थन पत्र संस्थेच्या मार्फत आंदोलक यांना देण्यात आले.
या उपक्रमाला अॅड. हेमराज काबलिया(उपाध्यक्ष), इं. देवेन्द्र काबलिया, अॅड. जितू केशवानी, अॅड. मनोज मंडाडे, अॅड. गोविंदा ढोरके, अॅड. नितीन खोब्रागडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सर्वोदय कल्याणकारी युवा व महिला मंच (स्वतंत्र आयाम) या संस्थेचे मार्गदर्शक अॅड. आशिष जी. मुंधाडा यांची विशेष उपस्थिति होती.


