Thursday, July 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रीडा क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही प्रगतीची नांदी – आ. किशोर जोरगेवार*

क्रीडा क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही प्रगतीची नांदी – आ. किशोर जोरगेवार*

*क्रीडा क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही प्रगतीची नांदी – आ. किशोर जोरगेवार

*भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने महिलांची खुली कबड्डी स्पर्धा, अभिनेत्री संस्कृती साळुंखे ठरल्या विशेष आकर्षण*

महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही आत्मविश्वासाने पुढे येत आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच चालना मिळेल, क्रीडा क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही प्रगतीची नांदी आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने बाबूपेठ येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी मैदानात जिल्हास्तरीय रात्रकालीन महिलांची खुली कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला “बिग बॉस मराठी सीजन ६” आणि “जाऊ बाईच्या घरात” फेम अभिनेत्री संस्कृती साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, ती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. यावेळी सिनेट सदस्य शुभांगी नक्षीने-उंबरकर, माजी महापौर राखी कंचर्लावार, मनपा स्थायी समिती सभापती मनस्वी गिर्हे, कल्याणी किशोर जोरगेवार, गटनेते चंद्रशेखर शेट्टी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका सविता कांबळे, सायली तोंडरे, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, विमल काटकर, कौसर खान, नगर सेविका शीतल गुरुनुले, पुष्पा उराडे, राजलक्ष्मी कारंगल, अॅड. सारिका संदुरकर, आशा देशमुख, ज्योती जिवने, अनुजा कुलसंगे, डिलन केळझरकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कबड्डीसारख्या पारंपरिक खेळात महिलांचा वाढता सहभाग पाहून विशेष समाधान वाटते. पूर्वी महिला केवळ घरापुरत्या मर्यादित राहायच्या; मात्र आज शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि क्रीडा यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात त्या आत्मविश्वासाने पुढे येत आहेत. हा सकारात्मक बदल आपल्या समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे.
क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून, ती शिस्त, संघभावना, जिद्द आणि आत्मविश्वास शिकवते. आज या मैदानावर उतरलेल्या प्रत्येक खेळाडू भगिनीमध्ये हीच ऊर्जा आणि जिद्द दिसून येत आहे. तुमच्यातील ही जिद्दच तुम्हाला पुढे मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात अभिनेत्री संस्कृती साळुंखे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने ठसा उमटविला असून, त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.
श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचा उद्देश केवळ स्पर्धा आयोजित करणे नसून, समाजातील प्रत्येक घटकाला—विशेषतः महिलांना—आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणे हा आहे. या माध्यमातून अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे येतील आणि भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular