Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रामीण पत्रकार संघयुवा, चंद्रपूर* *दिनांक : 30/04/2026* *बल्लारपूर-ऊर्जा नगर बससेवा अचानक बंद;...

ग्रामीण पत्रकार संघयुवा, चंद्रपूर* *दिनांक : 30/04/2026* *बल्लारपूर-ऊर्जा नगर बससेवा अचानक बंद; 45°C तापमानात गरीब रुग्णांचे हाल* युवा ग्रामीण पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा*

 

*चंद्रपूर:* बल्लारपूर ते ऊर्जा नगर दरम्यान अनेक वर्षांपासून सकाळी 6:30 व सायंकाळी 6 वाजता धावणारी एसटी बससेवा मागील दोन-तीन दिवसांपासून अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या बसमुळे बल्लारपूरमधील शेकडो गरीब रुग्ण दररोज शासकीय दवाखाना, चंद्रपूर येथे उपचारासाठी जात होते. तसेच शाळकरी विद्यार्थी, क्लासला जाणारे विद्यार्थी व शासकीय कामासाठी जाणारे नागरिक या बसवर अवलंबून होते. सध्या बल्लारपूर-चंद्रपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर गेले असून, बस बंद झाल्याने गरीब रुग्ण उपचाराविना तळफळत आहेत.

या गंभीर समस्येची दखल घेत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड यांनी आगार व्यवस्थापक, म.रा.प.मंडळ, चंद्रपूर यांना निवेदन दिले. “ही बस तात्काळ सुरू करावी. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील”, असा इशारा राहुल गायकवाड यांनी दिला आहे.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no.   9604343287 जाहिराती करता संपर्क साधावा


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular