
मुख्य संपादक — योगिता पाटेकर mo. no.– 9604343287 जाहिराती व युज करिता संपर्क साधावा
महाराष्ट्र राज्य पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 2 ने जारी केलेल्या बदली आदेशानुसार राजुरा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. आसिफ राजा शेख यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. आसिफ राजा शेख यांनी आपल्या पोलीस सेवेची सुरुवात नागपूर विभागातून केली. तेथे विविध महत्त्वाच्या पदांवर उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात बदली झाली. चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस, बल्लारशाह, रामनगर आणि राजुरा येथे ठाणेदार पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
*कार्यशैलीचा ठसा:*
श्री. शेख यांच्या कामाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे *जलद तपास, प्रलंबित गुन्ह्यांची उकल, कायद्याचा धाक निर्माण करणे आणि टीमवर्कच्या माध्यमातून सर्वोत्तम निकाल मिळवणे.* त्यांनी आपल्या कार्यकाळात कनिष्ठ कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करून त्यांच्याकडून उत्कृष्ट काम करवून घेतले.
शिस्तबद्ध प्रशासनासोबतच मानवी संवेदनांचा विचार करणारे अधिकारी म्हणून पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा आहे. धोपटाळा हत्याकांडासारख्या संवेदनशील प्रकरणांचा तपासही त्यांनी हाताळला आहे.
पोलीस वर्तुळातून व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियेनुसार, सोलापूर शहरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणीही श्री. आसिफ राजा शेख आपल्या अनुभवाच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर प्रभावी कामगिरी बजावतील.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


