मुख्य संपादक — योगिता पाटेकर mo.no. 9604343287 ..SP India news
अर्पित वाहाणे
वर्धा – मो 8956647004
वर्धा कु. सेजल चंदा संजयराव देठे तसेच
कु. प्राजिता जीवन ढाणके
हिची एमआयडीसी मध्ये अनुरेखक या पदासाठीनिवड झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 29 मे 20 26 ला सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ प्रवीण काळे, होते तर प्रमुख अतिथी प्रभागातील नगरसेविका शितल मोहोड व सामाजिक कार्यकर्ते गौरव मोहोड उपस्थित होते.
मुंबई येथे पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या
कु. सेजल चंदा संजयराव देठे तसेच
कु. प्राजिता जीवन ढाणके
हिची एमआयडीसी मध्ये
अनुरेखक या पदासाठी
निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी आजच्या आधुनिक काळातही वाचन संस्कृतीचे महत्त्व महत्त्वपूर्ण आहे. वाचन संस्कृती जपली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य करिता वाचनालयाने चालवलेला उपक्रम चांगला आहे असे विचार नगरसेविका शितल मोहोड यांनी व्यक्त केले.
तर सकारात्मक विचार सातत्याने प्रयत्न व एकाग्रचित्ताने ध्येय गाठण्याचा प्रवास यामुळे विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो असे विचार प्रा. डॉ.प्रवीण काळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सेजल देठे यांनी पोलीस भरतीचा प्रवास व त्यात मिळवलेले यश हे विद्यार्थ्यांना सांगितले.
प्राजिता ढाणके हिने सुद्धा याप्रसंगी विचार व्यक्त केले
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन व आभार ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले.
याप्रसंगी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा
.


