Tuesday, July 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedरखरखत्या उन्हात माणुसकीचा झरा! तहानलेल्या वाटसरूला मदतिचा हात  साजन बोकडे यांच्या संवेदनशीलतेचे...

रखरखत्या उन्हात माणुसकीचा झरा! तहानलेल्या वाटसरूला मदतिचा हात  साजन बोकडे यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक

मुख्य संपादक योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

बारव्हा :-सध्याच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकी अद्याप जिवंत असल्याचा प्रत्यय नुकताच लाखांदूर रस्त्यावर आला. रखरखत्या उन्हात पायी जाणाऱ्या एका अत्यंत गरजू आणि हताश वाटसरूला लाखांदूर येथील सजग नागरिक साजन बोकडे यांनी मदतीचा हात देत, केवळ जेवणच दिले नाही तर प्रवासासाठी आर्थिक मदत करून त्याला सुखरूप घरी रवाना केले. या संवेदनशील घटनेची परिसरात मोठी चर्चा असून बोकडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास साजन बोकडे हे विरली (बु.) कडून लाखांदूरकडे येत होते. यावेळी सरांडी-पाऊनगाव समोरून लाखांदूर रस्त्याने एक व्यक्ती रखरखत्या उन्हात पायी चालताना त्यांना दिसला. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. तो अत्यंत थकलेला दिसत होता. त्याची ही अवस्था पाहून साजन बोकडे यांनी आपली दुचाकी थाबविली
त्या व्यक्तीला गाडीवर बसवून विचारपूस केली असता, त्याने आपले नाव व हकीकत सांगितली. तो मूळचा कुरखेडा जवळील कोरची-बिडगाव येथील रहिवासी असून, सध्या उंटवाल्याकडे मेंढ्या चारण्याचे काम करतो. काही घरगुती कामासाठी तो आपल्या गावी चालला होता. मात्र, त्याच्या मालकाने त्याला प्रवासासाठी अवघे १०० रुपये दिले होते. घर लांब आणि खिशात पैसे कमी असल्याने त्याने थेट वडसापर्यंत पायी जाण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून उर्वरित १०० रुपयांत वडसावरून गावी जाण्यासाठी गाडीचे तिकीट काढता येईल.

त्या वाटसरूची ही व्यथा आणि डोळ्यांतील दुःख पाहून साजन बोकडे हे हेलावून गेले. त्यांनी तात्काळ त्याला आपल्या दुचाकीवर बसवून लाखांदूर येथील शिवाजी चौकातील एका भोजनालयात आणले. तेथे त्याला पोटभर जेवण दिले. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी त्याला पुन्हा गाडीवर बसवून वडसा फाट्यावर आणले. त्याला गावी सुखरूप पोहोचता यावे यासाठी स्वतःच्या खिशातून तिकीट व खर्चासाठी २०० रुपये दिले आणि त्याला ऑटोमध्ये बसवून दिले.
आपल्या हलाखीच्या परिस्थितीत देवदूतासारख्या धावून आलेल्या साजन बोकडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्या वाटसरूच्या भावना अनावर झाल्या. ऑटोमध्ये बसण्यापूर्वी त्याने साजन बोकडे यांना घट्ट मिठी मारली. या भावनिक प्रसंगी उपस्थित असणाऱ्यांचे आणि स्वतः बोकडे यांचेही डोळे पाणावले.


SP India news channel , मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular