Tuesday, July 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोरवा येथील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमकपीडित बालिकेला तातडीने वैद्यकीय...

मोरवा येथील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमकपीडित बालिकेला तातडीने वैद्यकीय उपचार, मानसोपचार व समुपदेशनाची मागणीसंवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त आणि शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याचीही आमदार मुनगंटीवार यांची मागणी

मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 SP India news 

चंद्रपूर, दि. २९ : चंद्रपूर शहरालगतच्या मोरवा गावातील वसाहतीत २८ जून २०२६ रोजी अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पडोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा जलद, निष्पक्ष व प्रभावी तपास करून दोषीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल, यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी त्यांनी विधानसभेत केली.

आ. मुनगंटीवार यांनी वाढत्या बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे सभागृहात नमूद केले. पीडित बालिकेला तातडीने तज्ज्ञांकडून वैद्यकीय उपचार, मानसोपचार व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषीला कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यात यावी, अशीही आ.मुनगंटीवार यांनी मागणी केली.

यासोबतच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, शाळा व परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे, बालसुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अधोरेखित केले. बालकांच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करत अशा अमानुष कृत्यांविरोधात कठोर भूमिका शासनाने स्वीकारावी, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular