Tuesday, July 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedकाँग्रेस B L A यांचे प्रशिक्षण शिबिराचा आयोजन # महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

काँग्रेस B L A यांचे प्रशिक्षण शिबिराचा आयोजन # महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्यानिर्देशानुसार तसेच चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा. सुभाष भाऊ धोटे यांच्या आदेशानुसार,जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर आणि राज्याचे माजी विरोधी पक्ष नेता मा. विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली B L A-२ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मुख्य संपादक योगिता पाटेकर SP India news mo.no. 9604343287

गुरुवार दिनांक २ जुलै २०२६ रोजी बल्लारपूर येथील एकदंत लॉन येथे ७२-बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर शहर,बल्लारपूर तालुका,मूल तालुका तसेच पोंभुर्णा तालुका अंतर्गत संपूर्ण विधानसभा मतदार संघांतील एकूण ३६१ बूथ वरील बूथ लेवल एजेंट B L A यांच्यासाठी S I R मोहिमे अंतर्गत B L O यांच्या समन्वयाने मतदारांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होऊ नये यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले

या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी च्या आदिवासी विभागाचे समन्वयक व मुख्य प्रशिक्षक डॉ. प्रणितकुमार जांभुळे यांनी प्रोजेक्टर व स्लाइड्स द्वारे S I R प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. तसेच मतदारांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी,त्यावरील उपाययोजना आणि B L A द्वारे पार पाडावयाच्या जवाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण शिबिराला नगराध्यक्ष डॉ. अल्का वाढई,कांग्रेस चे शहर अध्यक्ष अब्दुल करीम भाई,तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे,उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य,B L A-१ भास्कर माकोडे,सिनेट सदस्य दिपक धोपटे डॉ. अनिल वाढई प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिराच्या सफलतार्थ इस्माईल ढांकवाला,मेहमूद पठाण,चेतन गेडाम वैशाली हुमने,सत्यशिला साळवे,अमकुबाई भुक्या ,शिल्पा चूटे ,अफसाना सय्यद यश माकोडे सविता मुसळे,प्रमोद धानोरकर,अजय जुमडे,श्रीनिवास रेब्बावार ,शिवबचन राजभर,राजू मारम वार,रमेश व सम्मया जक्कू,बाबू भाई ,अस्लम शेख अजिंक्य माकोडे आदी मंडळी कार्यरत होते. शिबिरात मोठ्या संख्येने बी एल ए उपस्थित होते.

SP India news Channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular