Friday, June 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedलातूर RTO इन्स्पेक्टर लाच घेताना रंगेहाथ पकडला - राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील...

लातूर RTO इन्स्पेक्टर लाच घेताना रंगेहाथ पकडला – राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबांनी दिला इशारा

 

 

मुख्य संपादक–  योगिता पाटेकर मो. 9604343287 .. SP India news

लातूर,  तालुक्यातील पेठ येथील पेट्रोल पंपाजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर मधील RTO इन्स्पेक्टर एका ट्रॅव्हल्स वाहनचालकाकडे 35 हजार रुपये लाच मागत असताना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिक “प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा ” यांनी त्याला रंगेहाथ पकडले.सदर ट्रॅव्हल्समध्ये परीक्षा देण्यासाठी जाणारी लहान मुले, महिला व विद्यार्थी होते. जवळपास हॉटेल नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. RTO इन्स्पेक्टरने कोणत्याही अधिकृत मुहमेन्ट रजिस्टरशिवाय, तपासणीच्या अधिकाराशिवाय वाहन अडवून वाहनात बसवून पैसे स्वीकारताना खंडापुरकर बाबांनी प्रत्यक्ष पाहिले. प्रवाशांना त्रास देणे, विनाकारण वाहन अडवणे आणि लाच मागणे हे कायद्याने गुन्हा आहे, अशी तंबी बाबांनी संबंधित इन्स्पेक्टरला दिली.óलातूर जिल्ह्यातील विविध भागात केवळ लाचखोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या अशा मुजोर अधिकाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही. लातूर जिल्ह्यातील जनतेने कोणत्याही RTO कर्मचाऱ्याला लाच देऊ नये. लाच मागितल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर लढा देऊन त्यांना निलंबित व बडतर्फ करेपर्यंत लढा सुरू राहील. ACB कडे तक्रार देऊन कठोर कारवाई करून घेऊ.असं काही आढळल्यास या नंबर वर संपर्क साधावा – 8888184444, 8055088888, 9673288000, 9422469677स्वाक्षरी
स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा
राष्ट्रीय अध्यक्ष 
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular