
*बल्लारपूर :* 1 मे 2026, जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

*पोलीस निरीक्षक श्री. बिपिन इंगळे तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. जंगमवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व अंमलदार वर्ग उपस्थित होता.

ध्वजारोहणानंतर पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “देशाच्या प्रगतीमध्ये कामगार वर्गाचे योगदान सर्वात महत्वाचे आहे. त्यांच्या कष्टामुळेच समाजाची घडी व्यवस्थित बसते. पोलीस दलातर्फे सर्व कामगार बांधवांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
पीएसआय जंगमवार यांनी देखील कामगारांच्या मेहनतीचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no.9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


