आदरणीय सर,
पोलीस स्टेशन बल्लारपूर अंतर्गत आज दिनांक 01/03/2026 रोजी 17/00 ते 18/00 वाजता पर्यंत आगामी सण उत्सव -होळी/ धुलीवंदन, शिवछत्रपती जयंती, रमजान ईद, गुढीपाडवा, हे सण शांततेने पार पाडावे व कायदा व सुव्यवस्थेत अबाधित राखण्याचे दृष्टीने पोलीस स्टेशन बल्लारपूर येथून रूट मार्च प्रारंभ करून ते गोल पुलिया, गणपती वॉर्ड नवीन बस स्टॅन्ड ते नगर परिषद चौक, रेल्वे चौक, ते पुराना बस स्टॉप ते ,परत पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे येऊन समाप्त करण्यात आले. रूट मार्च मध्ये 03अधिकारी 16 अंमलदार व 2 सैनिक उपस्थित होते.
करिता माहितीस सविनय सादर
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन बल्लारपूर



