Thursday, July 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedयांचे स्वा मुं डेगत,**भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने मंत्री पंकजा ...

यांचे स्वा मुं डेगत,**भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने मंत्री पंकजा *प्रदुषणावर तातळीने उपयोजना करण्याची आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी*


*भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने नियोजन भवन येथे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना श्री माता महाकालीची मूर्ती, शाल आणि फोटो फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी आ. किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांकडे मंत्री मुंडे यांचे लक्ष वेधले. औद्योगिक जिल्हा असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार, कर्करोग, त्वचारोग यांसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, शहरातून वाहणार्या नद्यांमध्ये औद्योगिक सांडपाण्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढले असून नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले
चंद्रपूर परिसरात कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक ठिकाणी कोळसा उघड्यावर वाहतूक केला जातो. यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
यासोबतच, वीज उत्पादन केंद्रांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी जुन्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. औद्योगिक भागात धावणार्या जड वाहनांची नियमित तपासणी करून प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, महामंत्री नामदेव डाहुले, बलराम डोडाणी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular