Friday, July 31, 2026
Google search engine

 

*बल्लारपुरात 1 मे ला ‘धम्मचक्र’ महानाट्याची धूमधाम; तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास मंचावर*

*बल्लारपूर*: तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा व कामगार दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर येथे 1 मे रोजी ‘धम्मचक्र’ या भव्य हिंदी महानाट्याची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

पेपरमिल कलामंदिरच्या खुल्या रंगमंचावर सायंकाळी 6:30 वाजता बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सायं. 7:30 वाजता महानाट्याचे सादरीकरण होणार आहे.

नागपूरच्या कृति थिएटर अँड स्पोर्ट अकादमी संस्थेच्या 60 कलाकारांचा यात सहभाग आहे. *पूर्व विदर्भात प्रथमच* 56 x 36 फूट व 8 फूट उंचीच्या भव्य मंचावर लेझर लाईट व दमदार साऊंडसह हा प्रयोग होत आहे.

*शितल दोडके* यांच्या दिग्दर्शनात व *मयुर शेन्डे* यांच्या लेखन-निर्मितीत साकारलेल्या या 3 अंकी महानाट्यात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यापासून सुरू झालेला बौद्ध धम्माचा प्रवाह, चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा कार्यकाळ आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय प्रवास जिवंत होणार आहे. शास्त्र-वाद व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धम्मातील योगदान हे या नाटकाचे खास वैशिष्ट्य आहे. *संकल्पना लालजी श्रीवास* यांची आहे.

 

 

SAIL चे प्रमुख महाप्रबंधक राजेश डी. गायकवाड, ठाणेदार बिपीन इंगळे, BJPPL चे उदय कुकडे व प्रविण शंकर , तसेच  विकास पेटकर  कार्याध्यक्ष रितेश बोरकर , माननीय अध्यक्ष पवन मेश्राम , सुमेध शेंडे , नगरसेवक विश्वास देशभ्रतार , आनंद वाळके,  सहसचिव निळकंठ पाटील, राजेश गावंडे, राजकुमार सोनारकर, प्रीतम उंबरे , उपाध्यक्ष महेंद्र रामटेके , प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सुमारे 300 प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असून *प्रवेश पूर्णपणे निःशुल्क* ठेवण्यात आला आहे. अध्यक्ष अतुल शेन्डे व महासचिव आकाशकांत दुर्गे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेची धूमधाम साजरी करण्यासाठी सर्वांना येण्याचे आवाहन केले आहे.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no.   ..9604343287 जाहिराती करता संपर्क साधावा



 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular