महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने दि. 30 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील 20 पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक *मा. श्री. मुमक्का सुदर्शन (भा.पो.से.)* यांची *अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा पोलीस अधीक्षक* म्हणून बदली करण्यात आली आहे.
मा. मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकाळात नक्षलविरोधी अभियान, अवैध व्यवसायांवर कारवाई, महिला सुरक्षेचे उपक्रम व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यांच्या जागी *मा. श्री. आयुष नोपाणी (भा.पो.से.)* यांची *चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक* म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मा. नोपाणी हे लवकरच पदभार स्वीकारतील.
SP Indian news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no…9604343287 जाहिराती करता संपर्क साधा



