
बल्लारपूर :* नगर परिषद, बल्लारपूर यांच्या वतीने आयोजित *’नगर अध्यक्ष चषक 2026’* क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज मोठ्या उत्साहात पार पडला. अंतिम फेरीत *डॉक्टर 11* आणि *पत्रकार 11* हे दोन संघ आमने-सामने आले होते.

नाणेफेक जिंकून *डॉक्टर 11 संघाने प्रथम फलंदाजी* करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित षटकात *80 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य* पत्रकार 11 संघासमोर ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना *पत्रकार 11 संघाचा डाव 50 धावांवरच आटोपला* आणि संपूर्ण संघ बाद झाला.

अशाप्रकारे *डॉक्टर 11 संघाने 30 धावांनी दणदणीत विजय मिळवत ‘नगर अध्यक्ष चषक 2026’ चे विजेतेपद पटकावले.नगराध्यक्षा सौ. अलका वाढाई* यांच्या हस्ते विजेत्या डॉक्टर 11 संघाला विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करून संघाचे अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाला *उपनगराध्यक्ष श्री. देवेंद्र आर्या, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, शहरातील पत्रकार बांधव* मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच *डॉ. राठी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर* देखील उपस्थित होते.

आपल्या भाषणात *नगराध्यक्षा सौ. अलका वाढाई* म्हणाल्या की, “यावर्षीप्रमाणे दरवर्षी हा चषक मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.” त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे आभार मानले आणि विजेत्या संघाचे विशेष अभिनंदन केले.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती करता संपर्क साधावा


