
15 तारखेला होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत -आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभाग यांनी कंत्राटदार व दलाल यांच्या हितासाठी दोषपूर्ण प्रक्रिया करून मागविलेल्या निविदा रद्द करून पारदर्शी पणे फेरनिविदा घेण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका भारती दिलीप पोटफोडे यांचं आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आमदार सुमितदादा वानखेडे, मुख्याधिकारी डॉ किरणजी सुक्कलवाड, नगराध्यक्षा सौ स्वाती प्र गुल्हाने यांना निवेदन

आर्वी :- आर्वी न.प निवडणूक होऊन तीन महिने झालेत तीन महिन्यात यापूर्वी एक स्थायी समितीची व एक सर्वसाधारण सभा झाली, आता 15/05/2026 ला स्थायी समितीची सभा बोलावण्यात आली आहे, या सभेच्या इतिवृतातील परिशिष्ठात घेण्यात आलेल्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नगरसेविका व पदाधिकारी यांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे, यापूर्वी दर वर्षी उन्हाळ्यात आर्वी शहरातील ज्या प्रभागात पाण्याची अडचण असली तिथे टँकर द्वारा मोफत पाणी पुरवठा व्हायचा मात्र यावर्षी पासून न.प आर्वीने 500 दर आकारणी केली आणि ज्या प्रभागात पाणी अडचण भासली तिथल्या नगरसेविका -नगरसेवक यांनी स्वतः पैश्याचा भरणा करून प्रभागात पाणी पुरवलं,

परंतु यापूर्वी पाण्याचे पैसे हे न.प फंडात जाऊन त्याचा फायदा न.प ला व्हायचा परंतु आता स्थायी समितीच्या सभेच्या इतिवृतातील विषय क्रं 14 नुसार पाणी पुरवठा कंत्राटदारा द्वारा पाणी पुरवठा होईल आणि एका टँकर चे 1500 रु भरणा करावा लागेल – यामुळे गोर गरीब सामान्य माणसाचे पैसे लुटून कंत्राटदाराचे घर भरण्याच पाप आर्वी नप पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्वी न.प मध्ये निव्वळ धंदा करण्यासाठी आलेल्या काही दलालांनी करण्याच ठरवलेल्याचा घनाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या शिष्टमंडळाने केला आहे ,

तसेच पाणी पुरवठा कंत्राटाची प्रक्रिया पूर्णपणे दोषपूर्ण राबविली असून स्पर्धा झाली असती तर 200-300-ते 500 रुपयात पाणी पुरवठा करणारे कंत्राटदार स्पर्धेत आले असते करिता निविदेत झालेली दोषपूर्ण प्रक्रिया पाहता निविदा रद्द करावी -व पारदर्शी स्पर्धात्मक निविदा बोलवावी तसेच न.प नी सार्वजनिक अडचणीत असलेल्या शहरातील नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करावा व व्यक्तिगत टँकर साठी 300 रु आकारणी करण्याची मागणी दि. 07/05 च्या निवेदनात यापूर्वी सुद्धा केली होती. आता उन्हाळा जरी संपत आला असला तरी हा अन्यायकारक निर्णय नागरिकांच्या मानगूटीवर लादला गेला तर नागरिकांच मोठं शोषण होईल अस स्पष्ट केल

तसेच आर्वी शहरातील घनकचरा संकलन वाहतूक -मनुष्य बळ कंत्राटदार हे आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासन सरकार व जनतेच्या पैशाची लूट करत असून मोठी अनियमितता या कामात होत असल्याचे निदर्शनास आणून दिले व शहरातील साफ सफाई स्वछता – नाल्यातील गाळ उचलणे कामाचा बट्याबोळ कंत्राटदारानी केला असल्याचे सांगितले कंत्राटदाराची दादागिरी इतकी वाढली की कंत्राटदार अधीकारी नगरसेवक कोणालाच जुमानत नसून आवाज उचलणाऱ्या लोकसेवकाला जितका कामगार व कर्मचाऱ्यांकडून देता येईल तितका त्रास देत

प्रभागातील कामाला प्रभावित करण्याच काम कंत्राट दार करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच शहरात साफ सफाई स्वछता करण्यासाठी नियमानुसार सर्व घन्टा गाडयांना जी पि एस लावून सर्व नियमांची काटेकोर अंमल बजावणी करण्याची मागणी मुख्याधिकारी डॉ किरणजी सुक्कलवाना यांना सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे, या निवेदनाची प्रत मा. आ. श्री सुमितदादा वानखेडे हे मुंबई असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात दिली असून मुंबई वरुन परत आल्यावर सर्व बाबीच गांभीर्य लक्षात आणून देणार असल्याच सांगितले तसेच निवेदनाची प्रत आर्वी नगराध्यक्षा यांना सुद्धा देण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कमलेश चिंधेकर, अनिल मेंद्रे, रेखा वानखेडे, निशा थुल, सोनाली जैन, सोनू चिंधेकर,मंगेश लांजेवार, सिद्धार्थ कळंबे, रविंद्र वानखेडे, सोनिका गोधने दिनकर कोयरे प्रामुख्याने उपस्थित होते
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. No. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


