Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedबल्लारपूर हादरले: 17 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या जन्मदिवसाच्या एक दिवस...

बल्लारपूर हादरले: 17 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधीच काळाने घातला घाला

बल्लारपूर, विसापूर: बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील विसापूर गावात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. 17 वर्षीय युवकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

मृतकाचे नाव: विन्या बापू आगदर्शी, वय 17, रा. किल्ला वॉर्ड, बल्लारपूर.
उद्या 19 तारखेला त्याचा वाढदिवस होता, अशी माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार बल्लारपूर शहरातील चार युवक विसापूर येथे गेले होते. आपसी वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी देखील बल्लारपूर शहरातीलच आहेत. पूर्वनियोजित कट रचून हत्या केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

हत्या का केली? जुने वैमनस्य होते का? आरोपी कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात लवकरच मिळतील. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular