Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्वीत भीम-सूर्य तळपला : प्रकाश दादा पाटणकरांच्या आवाजाने शहर दुमदुमले

आर्वीत भीम-सूर्य तळपला : प्रकाश दादा पाटणकरांच्या आवाजाने शहर दुमदुमले

SP India news channel संपादक योगिता पाटेकर-9604343287

वर्धा–अर्पित वाहाने न. 8956647004

आर्वी: बुद्ध-भीमाच्या विचारांची ललकारी घेऊन भारताचे सुप्रसिद्ध आंबेडकर गायक प्रकाश दादा पाटणकर आज आर्वीत अवतरले आणि अवघे शहर जयभीमच्या निनादाने पेटून उठले.

रविवारी बस स्टँड जवळ, वर्धा रोड येथे झालेल्या बुद्ध-भीम गीतांच्या संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाने आर्वीकरांच्या काळजाला हात घातला. ढोल-ताशे, फटाके आणि घोषणा देत दादांचे झंझावाती स्वागत झाले. माईक हाती घेताच प्रकाश दादांनी सुरांचा असा एल्गार केला की श्रोते जागेवरून उठून नाचू लागले.

“गीत संपले तरी विचार संपत नाही,” हे सांगणाऱ्या दादांच्या प्रत्येक गीतात बाबासाहेबांचा संघर्ष, बुद्धाची करुणा आणि संविधानाची ताकद होती. कार्यक्रम नुसता रंगला नाही, तो घरा-घरात विचार पेरणारा ठरला.

संविधान प्रचारक सुनील कांबळे, नागपूर यांनी दादांचे आर्वीत मनापासून स्वागत केले. “हा आवाज नाही, चळवळीची मशाल आहे,” असे म्हणत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आजच्या अंधारात भीम-गीतांचा उजेड पसरवणारे प्रकाश दादा पाटणकर हेच खरे प्रबोधनकार आहेत, हे आर्वीने आज अनुभव घेतला

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular