
SP India news संपादक योगिता पाटेकर ** 9604343287
वर्धा–अर्पित वाहाने no. 8956647004
बीड/वर्धा:नीट परीक्षेचा पेपर फोडून 23 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारा लातूरचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि पाकिस्तानला देशाची गुपिते विकणारा डीआरडीओचा माजी शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर, या दोन नावांनी आज संपूर्ण देश हादरला आहे. एकाने शिक्षणाचे मंदिर विद्रूप केले, तर दुसऱ्याने देशाच्या सुरक्षेलाच सुरुंग लावला. तरीही या दोघांवर पांघरूण घालण्याचे पाप कोण करतंय, हा खरा प्रश्न आहे.
नीट पेपर लीक प्रकरणात अटक झालेला प्रा. कुलकर्णी संघाशी निगडित आहे की नाही, हे कळायला मार्ग नाही. पण एक प्राध्यापकच जर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची होळी करत असेल, तर त्याला प्राध्यापक तरी कसे म्हणायचे? वर्गात उभे राहून नीतिमत्तेचे धडे देणारे हात जेव्हा देशाच्या पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा? हा आक्रोश आज प्रत्येक पालकाच्या मनात धुमसत आहे.
यावर काँग्रेस नेते हरिभाऊ सोळंके, सादोळा, माजलगाव यांनी सरकारला जाब विचारला आहे. “आज 23 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक कोणत्या मानसिक यातनेतून जात आहेत, हे सत्ताधाऱ्यांना कळणार नाही. कारण त्यांच्या डोक्यात बहुमताची हवा आणि हिटलर-मुसोलिनीचा आदर्श भरला आहे. जनतेला गृहीत धरणे हाच त्यांचा राज्यकारभार झाला आहे,” असा घणाघाती आरोप सोळंके यांनी केला.
प्रदीप कुरुलकरचे देशद्रोही कृत्य तर त्याहून भयानक आहे. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर, तोच शत्रूराष्ट्राला माहिती विकतो. कुरुलकर ते कुलकर्णी या दोघांची देशविघातक कृत्ये उघडकीस येऊनही हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांना पाठीशी घालणे, ही बाब देशाच्या मुळावर येणारी आहे.
“या दोघांच्या जागी जर एखादा मुस्लिम असता, तर मनुवादी विचारांच्या लोकांनी देशभर नंगानाच केला असता. टीव्हाच्या पडद्यावर रात्रंदिवस चर्चा झडल्या असत्या, देशद्रोहाचे शिक्के मारले गेले असते. पण गुन्हेगार आपल्या दावणीला बांधलेला दिसला की, सगळ्यांची तोंड शिवली जातात. ही दुटप्पी देशभक्ती कशासाठी?” असा जळजळीत सवाल हरिभाऊ सोळंके यांनी उपस्थित केला आहे.
गुन्हेगाराला जात नसते, धर्म नसतो. गुन्हा फक्त गुन्हा असतो. पण एका विशिष्ट धर्माला कायम टार्गेट करायचे आणि आपल्या माणसाने कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याला वाचवायचे, हा प्रकार देशाला पोखरणारा आहे. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे, मग तो प्रदीप कुरुलकर असो की कुलकर्णी. कायद्याने त्याचे काम करावेच, पण 23 लाख विद्यार्थ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांचे काय? मोदी सरकारच्या काळात वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे तरुणांच्या मनात नैराश्याची काळी छाया पसरली आहे, ही भीषण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
“जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय काँग्रेस”अशा बुलंद घोषणेसह हरिभाऊ सोळंके यांनी सरकारच्या धोरणांवर आसूड ओढले आहेत.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व युज करिता संपर्क साधावा


