Wednesday, June 3, 2026
Google search engine

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no 9604353287

वर्धा–अर्पित वाहाने ..8956647004

वर्ध्यात आजाद समाज पार्टीची ताकद वाढली : मासिक बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांचा दमदार प्रवेश, चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

वर्धा: खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या झुंजार नेतृत्वावर विश्वास ठेवून आज वर्धा जिल्ह्यात आजाद समाज पार्टीत अनेक नव्या चेहऱ्यांनी प्रवेश केला आणि पक्ष संघटनेची ताकद अनेकपटीने वाढली. जिल्हा मासिक बैठकीत व पक्ष प्रवेश सोहळ्यात वातावरण अक्षरशः आजादमय झाले होते.

प्रदेश महासचिव अरविंद कांबळे व जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पक्ष संघटना गाव-खेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व बहुजनांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी नवी फळी उभी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी पदी निर्मलाताई पेटारे, युवा जिल्हा सचिव पदी सागर अंभोरे, तालुकाध्यक्ष पदी भगवान गंगावणे व भास्कर सरोदे यांच्यासह भागिनाथ गजभार, रविभाऊ निकम, स्वप्निल बिरारे, सुरेश जगधने, विनोद कीर्तीशाही, रमेश दाभाडे यांसारख्या लढाऊ कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली. नव्या दमाच्या या टीममुळे वर्धा जिल्ह्यात आजाद समाज पार्टीचा झंझावात पाहायला मिळणार, हे निश्चित.

बैठकीत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला. सामाजिक प्रश्नांवर आवाज बुलंद करण्यासाठी आणि आगामी काळातील आंदोलनांची रणनीती ठरवण्यासाठी सविस्तर चर्चा झडली. “गाव तिथे शाखा, घर तिथे आजादचा कार्यकर्ता” हा नारा देत पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याची शपथ घेतली.

याप्रसंगी जिल्हा प्रभारी राहुल साबळे, युवा जिल्हाध्यक्ष अनामी मोरे, शहराध्यक्ष जावेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाऊ गवारगुर व सलमान पठाण, महिला आघाडी शहराध्यक्ष सारिका ताई जाधव यांच्यासह खालिल शेख, अमोल सोनवणे, नितीन वाहुळ, राहुल खांडे, राहुल जाधव, महेंद्र भाऊ मिसाळ, संतोष इंगोले यांसारखे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी विजय शिनगारे, जिल्हाध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या. वर्धा जिल्ह्यात आता “आजाद समाज पार्टी” बहुजनांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार, असा इशाराच यावेळी देण्यात आला.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

या चैनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular