Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्राच्या राज महाराष्ट्राच्या कारणात अनेक नेते आले आणि गेले, मात्र आपल्या कार्यशैलीने,...

महाराष्ट्राच्या राज महाराष्ट्राच्या कारणात अनेक नेते आले आणि गेले, मात्र आपल्या कार्यशैलीने, अभ्यासू वृत्तीने आणि जनतेसाठी सातत्याने काम करण्याच्या ध्यासाने काही नेते लोकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करतात. अशाच नेतृत्वांपैकी एक नाव म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार हे केवळ राजकारणी नाहीत, तर दूरदृष्टी असलेले अभ्यासू आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

मुख्य संपादक–योगिता पाटेकर ..एसपी इंडिया न्यूज mo.no.9604343287 

 

राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर असलेली पकड आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांबद्दल असलेली संवेदनशीलता यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मंत्रीपद असो किंवा नसो, सुधीरभाऊंनी प्रत्येक भूमिकेत जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण, अर्थकारण, ग्रामीण विकास, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मांडलेले विचार आणि घेतलेले निर्णय हे नेहमीच राज्याच्या हिताचे राहिले आहेत.

त्यांच्या कामामध्ये केवळ राजकारण नसून विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन दिसून येतो.
आज महाराष्ट्र अनेक सामाजिक, आर्थिक आणि कृषी समस्यांना सामोरे जात आहे. अशा काळात राज्याला अभ्यासू, संयमी, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. जनतेशी नाळ जोडून काम करणारे आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारे नेतृत्व म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आशेने पाहिले जाते.

राजकारणात टीका आणि मतभेद हे स्वाभाविक असतात, पण आपल्या कामातून लोकांचा विश्वास संपादन करणारे नेतृत्व फार कमी असते. सुधीरभाऊंनी आपल्या कार्यातून तो विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाची राज्याला आज नितांत आवश्यकता आहे.

– सुहास पाटील
सांगली

SP India news Channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604353287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

चैनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular