Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedतळेगाव-आर्वी रोडवर भीषण अपघात, बालाजी वार्डातील 49 वर्षीय तरुणाचा मृत्यू* गजानन दातीर...

तळेगाव-आर्वी रोडवर भीषण अपघात, बालाजी वार्डातील 49 वर्षीय तरुणाचा मृत्यू* गजानन दातीर यांच्या अपघाती निधनाने आर्वी शहरात शोककळा

SP India news मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604343287

वर्धा अर्पित वाहाणे
मो 8956647004

आर्वी शहरातील बालाजी वार्ड येथील रहिवासी श्री गजानन श्रावण दातीर (वय 49 वर्षे) यांचे दिनांक:-22/5/2026ला रात्री12.30वाजताच्या मध्य रात्रीच्या……. सुमारास,तळेगाव-आर्वी रोडवरील रानवाडी शिवारात झालेल्या भीषण अपघातात दिनांक 22 मे 2026, गुरुवार रोजी सायंकाळी 5.00 वाजता अमरावती येथे राजापेठ येथील रेडिएंन्ड दवाखान्यात 5.00 च्या दरम्यान दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण बालाजी वार्ड आर्वी, कुभांरवाडा, परिसरासह आर्वी शहरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन दातीर हे दिनांक 22 मे रोजी काही कामानिमित्त तळेगाव-आर्वी मार्गाने जात असताना रानवाडी जवळ त्यांचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत काळाने त्यांच्यावर झडप घातली होती.

गजानन दातीर हे अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने बालाजी वार्डातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात एकुलता एक मुलगा व मोठा आप्त परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे छत्र हरपल्याने दातीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

*अंत्यसंस्कार:* कै. गजानन श्रावण दातीर यांची अंतिमसंस्कार यात्रा उद्यादिनांक 23 मे 2026, शनिवार रोजी दुपारी 2.00 वाजता राहत्या घरून, बालाजी वार्ड, आर्वी येथून स्थानिक मोक्षधामकडे निघणार आहे. अंत्यसंस्कारास नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दातीर परिवारातर्फे करण्यात आले आहे.

*शेजाऱ्यांनी व्यक्त केला शोक:* “गजानन भाऊ अतिशय प्रेमळ होते. गावात कोणाचेही कार्य असो, धावून जाणारे होते. त्यांच्या जाण्याने वार्ड पोरका झाला”, अशा शब्दात शेजाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व दातीर कुटुंबास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
*भावपूर्ण श्रद्धांजली*
*ॐ शांती*

एस पी इंडिया न्यूज चैनल–मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular