Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedबुद्ध लेणी पाहताना अचानक समोर आलेल्या शिबिरात सम्यक घुले आणि यश बनसोड...

बुद्ध लेणी पाहताना अचानक समोर आलेल्या शिबिरात सम्यक घुले आणि यश बनसोड यांचे रक्तदान; त्यानंतर सम्यक घुले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ प्रदान

मुख्य संपादक — योगिता पाटेकर मो. 9604343287 SP India news

वर्धा अर्पित वाहाणे
मो 8956647004

नाशिक:सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कृतीतून जगणारे युवा सामाजिक कार्यकर्ते सम्यक रवींद्र घुले यांना २३ मे रोजी नाशिक येथे प्रतिष्ठेचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच त्यांच्याकडून दिवसभरात एक अत्यंत कौतुकास्पद सत्कार्य घडले.

झाले असे की, पुरस्कार सोहळ्याच्या आधी सम्यक घुले हे आपले सहकारी यश बनसोड,आशिष खरतडे,रोनक मेश्राम,सोहम शेंदरे,कारुन्य वाघमारे व अनुराग भगत यांच्यासोबत नाशिक येथील ऐतिहासिक व पवित्र बुद्ध लेणी पाहण्यासाठी गेले होते. तेथे एका रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याची त्यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. परंतु, तिथे पोहोचल्यावर सामाजिक बांधिलकी जपत सम्यक घुले आणि यश बनसोड यांनी कोणताही विचार न करता तात्काळ उत्स्फूर्तपणे प्रत्यक्ष रक्तदान केले.

केवळ लेणी पर्यटनासाठी गेलेल्या या तरुणांनी कोणतीही पूर्वतयारी नसताना केवळ गरजू रुग्णांच्या मदतीसाठी तात्काळ पुढे येत रक्तदान केले. हा कौतुकास्पद प्रसंग घडल्यानंतर, पुढे मुख्य सोहळ्यात सम्यक घुले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. आधी प्रत्यक्ष कृतीतून बाबासाहेबांचे विचार जगणे आणि त्यानंतर त्याच विचारांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणे, हा एक अतिशय सुखाद आणि दुर्मिळ योगायोग ठरला.

*”आम्ही तिथे केवळ बुद्ध लेणी पाहण्यासाठी गेलो होतो, रक्तदान शिबिराची आम्हाला कल्पना नव्हती. पण तिथे गेल्यावर बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा मिळाली आणि आम्ही दोघांनी आधी रक्तदान केले. त्यानंतर मला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच असे सत्कार्य आमच्या हाताने घडले, याचा मला आणि माझ्या सहकाऱ्याला सार्थ अभिमान आहे.”*
— *सम्यक घुले (पुरस्कार विजेते व सामाजिक कार्यकर्ते)*

बुद्ध लेणी सारख्या पवित्र परिसरात घडलेला हा प्रेरणादायी प्रसंग आणि त्यानंतर मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, यामुळे सम्यक घुले आणि यश बनसोड यांच्यावर सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील मान्यवर, हितचिंतक आणि मित्रांकडून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular