
मुख्य संपादक — योगिता पाटेकर मो. 9604343287 — SP India news
आर्वी : महाराष्ट्र शासनाने आखाती देशांमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी इंधनाच्या टंचाईवर उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसीन वाटप सुरू केले आहे. हे सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडिएस) अंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारकास प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन उपलब्ध करून दिल्या जात आहे. आज आर्वी येथील तहसील कार्यालयात १२ हजार लिटर क्षमतेचा केरोसीन टँकर वाटपासाठी शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिला होता. तहसीलदार हरीश काळे यांच्या उपस्थितीत खाली करण्यात आला. यावेळी निरीक्षण अधिकारी सौ. अनिता वानखडे यांच्या देखरेखीखाली केरोसीन वितरण प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यात आली. यावेळी पुरवठा निरीक्षक विजय दाईगडे, रणजित देशमुख, हरीश वाघ, हरिदास मदनकर यांच्यासह तात्पुरते केरोसीन परवानाधारक उपस्थित होते.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


