
मुख्य संपादक — योगिता पाटेकर mo.no.9604343287 SP India news
सेवाग्राम-हमदापूर-कांढळी हा सिमेंट रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाने बनविला आहे. सदर रस्त्यावरील पुलांची कामे अजूनही अपूर्ण असून या मार्गावर अनेक ठिकाणी जवळपास 4.4 इंचाच्या भेगा पडल्या आहेत. या धोकादायक भेगांमुळे मोटर सायकलने जाणाऱ्या प्रवाशांचे अपघात झाले आहेत.
अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही विभागाने दखल न घेतल्याने शेवटी नागरिकांनी खासदार अमर काळे यांचेकडे धाव घेतली. खासदार अमर काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला संपर्क साधून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्ह्यात जी रस्त्याची कामे रखडली आहेत, अपूर्ण आहेत ती तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, बरेच ठिकाणी वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे न करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांना न केलेल्या कामाचे भुगतान केले आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित अभियंत्यावर कार्यवाही करण्याची मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे. ज्या ठेकेदारांनी काम न करताच बिले उचलली त्या ठेकेदारांकडून सदर रक्कम वसूल करून त्यांच्यावरही कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या महामार्गाची तातडीने दुरुस्ती होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती न्यूज करिता संपर्क साधावा


