Saturday, August 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोलीस स्टेशन बल्लारपूर दिनांक: 28/05/2026 विषय: बकरी ईदच्

पोलीस स्टेशन बल्लारपूर दिनांक: 28/05/2026 विषय: बकरी ईदच्

मुख्य संपादक — योगिता पाटेकर मो. 9604343287 SP India news

दिनांक 28/05/2026 रोजी बल्लारपूर परिसरात होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून उप विभागीय पोलीस अधिकारी राजुरा मा. सुधीर नंदनवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला.

सदर रूट मार्च 18:30 वाजता पोलीस स्टेशन बल्लारपूर येथून सुरु होऊन गोल पुलिया, सिद्धार्थ वॉर्ड, गांधी पुतळा, जामा मस्जिद, असमा चौक या मार्गे परत मुख्य मार्गाने पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे 19:30 वाजता समाप्त झाला.

या रूट मार्च मध्ये 5 पोलीस अधिकारी, 41 पोलीस कर्मचारी, 13 होमगार्ड सैनिक आणि 1 एसआरपीएफ प्लाटून सहभागी झाले होते.

बकरी ईद सण शांततेत व सलोख्याने साजरा व्हावा, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच समाजकंटकांना कडक इशारा देण्याच्या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आला. बल्लारपूर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन बल्लारपूर

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular