
मुख्य संपादक — योगिता पाटेकर मो. 9604343287 – SP India news
वर्धा अर्पित वाहाणे
8956647004
बडनेरा राजकारण हे केवळ पद, प्रतिष्ठा किंवा सत्तेचे माध्यम नसते; ते समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे, लोकांच्या विश्वासाला न्याय देण्याचे आणि जनतेच्या अपेक्षांना कृतीत उतरविण्याचे एक मोठे उत्तरदायित्व असते. अशाच लोकाभिमुख नेतृत्वाचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रभाग क्र. २२ (नवी वस्ती, बडनेरा) चे सन्माननीय नगरसेवक मा. अजयभाऊ जायस्वाल.
सामान्य नागरिकांशी आत्मीयतेने जोडले गेलेले, प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारे आणि “माणुसकी” हेच आपले सर्वात मोठे भांडवल मानणारे अजयभाऊ यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या साधेपणातही नेतृत्वाची ताकद दिसते आणि त्यांच्या कार्यपद्धतीत लोकसेवेचा प्रामाणिक भाव जाणवतो.
बडनेरा शहराच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात अभिमानाने नोंद व्हावी अशी कामगिरी त्यांनी केली. अमरावती महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पद भूषवणारे बडनेरा शहरातील पहिले व्यक्तिमत्व म्हणून ते नाव रूपास येणार आहेत आणि बडनेरा शहराचा गौरव यामुळे वाढविला जाणार आहे. हे पद त्यांच्या राजकीय प्रवासातील यश नसून, बडनेरातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा आणि प्रेमाचा सन्मान आहे.
मा.अजयभाऊ जायस्वाल यांचे व्यक्तिमत्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती, युवकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका, ज्येष्ठांचा आदर आणि गरजूंसाठी तत्पर मदत ही त्यांची खरी ओळख आहे. त्यामुळेच ते “नेते” पेक्षा “आपले माणूस” म्हणून अधिक लोकप्रिय आहेत.
नवी वस्ती परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी बडनेरा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रविभाऊ राणा यांच्या मार्गदर्शनात व विकासाची दूरदृष्टी ठेवणारे रविभाऊ राणा यांच्या नेतृत्वगुण हेरून सातत्याने पाठपुरावा केला. मा. अजयभाऊ जायस्वाल हे लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे “मनमिळावूपणा”. कोणताही व्यक्ती भेटला तरी त्याचे शांतपणे म्हणणे ऐकून घेणे, समस्येची जाणीव ठेवून प्रशासनाशी समन्वय साधणे आणि शक्य त्या पद्धतीने मदत करणे ही त्यांची कार्यशैली नागरिकांना आपलीशी वाटते.
आजच्या स्पर्धात्मक आणि स्वार्थी राजकारणातही लोकांशी भावनिक नातं जपणारे नेतृत्व दुर्मिळ झाले आहे. मात्र मा. अजयभाऊ जायस्वाल यांनी आपल्या संयमी स्वभावाने, सामाजिक बांधिलकीने आणि लोकाभिमुख कामकाजाने एक वेगळी छाप निर्माण केली आहे.
बडनेरा शहराच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि समाजहिताच्या कार्यासाठी सातत्याने झटणाऱ्या या लोकनेत्याला भविष्यात आणखी मोठ्या जबाबदाऱ्या मिळोत, हीच जनतेची अपेक्षा आणि त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा….
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


