मुख्य संपादक–योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा …SP India news channel
वर्धा अर्पित वाहाणे
मो 8956647004
सावली तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात मका पिकाचे उत्पादन झाले असून अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. परंतु बाजारात मक्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते.उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यामुळे शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी सातत्याने करत होते.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान हे सामदा-सोनापूर परिसराच्या दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.तालुक्यातील शेतकऱ्यांनी मक्याला योग्य भाव मिळत नसल्याची व्यथा व्यक्त करत शासनाने त्वरित खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. खासदार किरसान यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते.
तसेच लोकलेखा समिती तथा काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील शासनाकडे मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जोरदार मागणी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.दरम्यान सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहने तसेच शेतकरी सहकारी विविध सोसायटी व्याहाड खुर्दचे अध्यक्ष दिपक जवादे यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. विविध स्तरांवर निवेदने देणे, अधिकाऱ्यांशी चर्चा करणे तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाथरी येथील शासकीय धान्य दुकानामध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून उद्यापासून शासकीय खरेदीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपला मका हमीभावाने विकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. खरेदी केंद्र सुरू झाल्याने व्यापाऱ्यांकडून कमी दराने होणारी खरेदी थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.तालुक्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून शासनाने खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. तसेच भविष्यातही शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव मिळावा आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


