Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedबल्लारपूरच्या भारती डुंबेरे यांचा 15 तास अखंड गायनाचा रेकॉर्ड पूर्ण; ‘इंडिया बुक...

बल्लारपूरच्या भारती डुंबेरे यांचा 15 तास अखंड गायनाचा रेकॉर्ड पूर्ण; ‘इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड’ साठी यशस्वी प्रयत्न*

 

*बल्लारपूर, 27 एप्रिल*: विदर्भातील प्रतिभावान गायिका कु. भारती डुंबेरे यांनी ‘इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड’ मध्ये नाव नोंदवण्यासाठी केलेला 15 तास अखंड गायनाचा संकल्प आज यशस्वीपणे पूर्ण केला.

भारती डुंबेरे यांनी सकाळी 8 वाजता सुरू केलेले गायन रात्री 11 वाजता पूर्ण करून 15 तासांचा अखंड गायनाचा रेकॉर्ड प्रस्थापित केला. या ऐतिहासिक कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड’ साठी पाठवण्यात येणार आहे.

*भारती डुंबेरे यांचा प्रवास:*

गेल्या 40 वर्षांपासून संगीत क्षेत्रात सक्रिय असलेल्या भारती डुंबेरे यांनी विविध स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिके मिळवली असून, अनेक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. “मेरी आवाज ही पहचान है” या ध्येयाने त्यांनी बल्लारपूर शहराचे नाव उज्ज्वल करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला होता

या रेकॉर्डसाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कठोर सराव केला. 15 तास अखंड गाणे ही केवळ प्रतिभेची नव्हे तर मानसिक व शारीरिक संतुलनाची कसोटी असल्याचे त्यांनी सांगितले. रियाजासोबतच आवाजाची काळजी, आहार व आरोग्यावर विशेष लक्ष दिले.

या 15 तासांत त्यांनी भक्तिगीते, सुगम संगीत, चित्रपट गीते व पारंपरिक रचना अशा विविध प्रकारच्या रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 

“हा प्रयत्न केवळ वैयक्तिक यश नाही, तर युवा पिढीला संगीताकडे प्रेरित करण्यासाठी आहे,” असे भारती डुंबेरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पौर्णिमा टिपले व सचिव किरण भांबोरे उपस्थित होत्या. आयोजकांनी नागरिकांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आभार मानले.

*बल्लारपूर*: गायिका भारती डुंबेरे यांनी 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत सलग 15 तास अखंड गायन करून ‘इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड’ साठी रेकॉर्ड प्रस्थापित केला. गोंडराजे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी  चित्रपट गीते सादर केली. वुमन्स पॉवर संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर   mo. no.   9604343287 जाहिराती करता संपर्क साधावा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular