
SP India news संपादक योगिता पाटेकर 9604343287
आर्वी:…भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने शब्दांपेक्षा कृतीतून समाजसेवा करणारे मार्शल अर्पित वाहाणे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेले रक्तदान केवळ एक उपक्रम न राहता, “माणुसकी हाच खरा धर्म” हा संदेश देणारी कृती ठरली.
आजच्या काळात रक्ताची गरज केव्हा, कुठे लागेल सांगता येत नाही. अपघात असो वा शस्त्रक्रिया, एक थेंब रक्त एखाद्याचे आयुष्य वाचवू शकते. हीच जबाबदारी ओळखून अर्पित वाहाणे यांनी स्वतःहून पुढाकार घेत रक्तदान केले.
युवकांसाठी संदेश:….“मोठ्या घोषणा नको, छोटी कृती करा. तुमच्या एका रक्तदानाने कुणाच्या घरचा दिवा विझायचा थांबेल,” असे अर्पित वाहाणे म्हणाले.
त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे आर्वी परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, अनेक युवक रक्तदानासाठी प्रेरित झाले आहे
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.mo. 9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


